Advertisement
*पायी नर्मदा परिक्रमा:* या वर्षी २० आक्टोबरचा दसरा झाल्यावर येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे २६ आक्टोबर २०२६ रोजी ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) येथे संकल्प करून पायी नर्मदा परिक्रमा सुरुवात करणार आहोत. त्यासाठी २४ ला रात्रीच ओंकारेश्वरला पोचावे लागेल.दिवाळीनंतर परिक्रमा करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते, खूप गर्दी होते. या गर्दीच्या पुढे असलो कि परिक्रमा निवांत शांत आनंदात होते, म्हणून आधी सुरुवात करतोय. दुसरा फायदा हा कि परिक्रमा संपताना शेवटी उन्हाळा सुरु झाला कि उन्हाचा त्रासही होतो, तो कमी होईल. साधारण चार महिने लागतील ३१०० किलोमीटरच्या परिक्रमेला.
परिक्रमा करवून घेणारी मैया, भगवान दत्तात्रेय व अवघी गुरुपरंपरा सोबत आहेच. कर्ते करविते तेच माध्यम फक्त आपले शरीर. मनाने तिथे अंतरंगात साधनेत नामात रमायचे हा आनंद व आसक्तिलोप, विवेकजागृति हा फायदा.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.
श्रीगुरुचरणरजामृतानंद सेवक
श्रीकृष्ण वसंत पुराणिक
२९ सप्टेबर २०२६.
नोटः या दिवसात ग्रुपवर अनुपस्थिती राहील व नंतरही आसक्तिलोपामुळे फारसा वावर राहाणार नाही. लिखाण कमी होईल असे वाटते. इतके दिवस सर्वच, विविध अध्यात्मिक विषयावर भरपूर व पुरेसे लिखाण झाले आहे. कुठेतरी, कधीतरी हे सारे थांबलेच पाहिजे ना.
Advertisement
Event venue
Omkareshwar, Indore, India
Tickets