#StayHappening
Sun, 01 Nov, 2026 at 06:30 pm UTC+05:30

post

  • Kurla East · Mumbai
POOJA story Publisher / Host POOJA story
Share
post
Advertisement
पुढे.....
पुण्याच्या खडकी परिसरातील लष्करी कॅम्पमधील वातावरण नेहमीप्रमाणेच शिस्तबद्ध होत...पण लष्करी कॅम्पमधील चौकशी कक्षातलं वातावरण त्यापेक्षाही जास्त तापलेलं होतं. हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड 'जाफर' लोखंडी खुर्चीला साखळदंडाने जखडलेला होता. मेजर रुद्रप्रताप निंबाळकर त्याच्या समोर उभा होता. रुद्रचे डोळे लाल झाले होते आणि हाताच्या शिरा रागाने तडतडत होत्या..
देख क्या रहा है? मुँह खोल! तेरे साथ और कौन-कौन था? और तुम्हारा अगला प्लॅन क्या है?"रुद्रने त्याचा कॉलर गच्च पकडला आणि त्याच्या डोळ्यांत डोळे घालून ओरडला...
पण समोर लोखंडी खुर्चीला साखळदंडाने जखडलेला 'जाफर' निर्लज्जपणे हसत होता...
"मेजर... तूने कितना भी टॉर्चर कर ले, पर मैं मुँह नहीं खोलूँगा! मेरी जान चली जाती है तो भी कोई दिक्कत नहीं... हम मौत से नहीं डरते!"
रुद्रचा पारा चढला. त्याने जाफरला तिथेच झटकलं आणि तो बाहेर कॉरिडॉरमध्ये आला. टेबलावर पडलेला पाण्याचा ग्लास त्याने बाजूला सारला आणि संतापाने लाकडी टेबलावर जोरात बुक्की मारली. "धडक!" लाकूड कडकडलं, पण रुद्रच्या चेहऱ्यावर वेदना नव्हत्या, फक्त एक अतीव हतबलता होती.
विक्रम धावत तिथे आला. "रुद्र, शांत हो! काय झालं?"एवढा का चिडला आहेस?
तो नराधम आत बसून मला आव्हान देतोय. त्याने माझ्यासमोर निष्पाप लोकांना मारहाण केली.. कित्येक निष्पाप लोकांनवर गोळ्या झाडल्या...आणि आता? आपली सिस्टीम त्याला कोर्टाच्या तारखा, पुरावे आणि मानवाधिकाराच्या नावाखाली संरक्षण देईल. त्याला तर भर चौकात उभं करून गोळ्या झाडायला हव्या होत्या! पण आपण कायद्याने बांधले गेलो आहोत विक्रम... ही हतबलता मला आतून खाऊन टाकतेय."
विक्रमने रुद्रच्या खांद्यावर हात ठेवला. "रुद्र, आपण सैनिक आहोत. कायद्याचं रक्षण करणं आपलं काम आहे. तू गेल्या दोन दिवसांपासून नीट झोपला नाहीस. आज आपल्याला 'ऑफ' आहे. तू घरी जा. आई-बाबा आठवण काढत असतील."
मी एकटाच नाही, तू सुद्धा येतो आहेस माझ्यासोबत घरी! आईने तुला सुद्धा बोलावलं आहे. तिने मला बजावून सांगितलंय की विक्रमला घेतल्याशिवाय घरी पाऊल टाकायचं नाही."
विक्रम थोडा हसला. "अरे, पण रुद्र.. मी तिथे येऊन काय करू?"
"तू येणार आहेस, बस! मला तिथे बाबांच्या प्रश्नांना तोंड द्यायला तुझी सोबत लागेल," रुद्रने आपली बॅग उचलत म्हटलं. विक्रमनेही हार मानली आणि दोघंही निंबाळकर निवासाकडे निघाले..
दुपारची रखरखती वेळ होती. निंबाळकर निवासाच्या शांत गल्लीत बुलेटचा तो ओळखीचा आणि खणखणीत आवाज दुमदुमला. हॉलमध्ये सोफ्यावर पाय वर करून पुस्तक वाचत बसलेली शंभू, तो आवाज ऐकताच तिने कान टवकारले आणि दुसऱ्याच क्षणी आनंदाच्या भरात हातातलं पुस्तक तिथेच सोफ्यावर फेकून ती दाराच्या दिशेने पळत सुटली.
"आई! आई बघ, दादा आला! दादा आला!" शंभूचा ओरडा ऐकून किचनमधून यशोदा काकू घाईघाईने पदराने हात पुसत बाहेर आल्या.
रुद्रने अंगणात गाडी उभी केली आणि इंजिन बंद केलं. हेल्मेट काढून त्याने आरशात स्वतःचा चेहरा पाहिला; डोळ्यांत थकवा होता, पण घराचा उंबरठा समोर दिसताच एक वेगळीच शांतता त्याच्या चेहऱ्यावर पसरली. त्याच्या मागोमाग विक्रमही गाडीवरून उतरला...
रुद्रचं लक्ष घराच्या मुख्य दरवाज्याकडे गेलं आणि तिथे त्याला आपली चुळबुळी, लाडकी बहीण शंभू उभी असलेली दिसली. दादाला समोर पाहताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिचे डोळे चमकले आणि चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. रुद्रला पाहताच ती कसलाही विचार न करता, "दादाऽऽऽ!" अशी जोरात हाक मारत पळतच त्याच्या दिशेने सुटली.
रुद्रला आपल्या बहिणीच्या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. तिचं हे निष्पाप प्रेम बघून त्याच्या करारी चेहऱ्यावरचे भाव क्षणात मवाळ झाले. त्याने हसून आपले दोन्ही हात हवेत पसरले आणि पुढच्याच क्षणी शंभू आनंदाने पळतच थेट त्याच्या मिठीत शिरली. रुद्रने तिला प्रेमाने जवळ घेतलं. अनेक दिवसांच्या कामानंतर आणि सीमेवरच्या तणावानंतर, बहिणीची ही घट्ट मिठी रुद्रसाठी जगातील सर्वात मोठं सुख होतं.
विक्रम बाजूलाच उभा राहून या दोघा बहीण-भावाचं प्रेम निहाळत होता. रुद्रसारखा कठोर काळजाचा मेजर, जो शत्रू समोर उभा असताना पापणीही लववत नाही, तो आपल्या बहिणीसमोर किती मेणासारखा मऊ होतो, हे पाहून विक्रमला कौतुक वाटलं.
"काय ग शंभू! दादा आल्यावर ही अशी मिठी... आणि माझा साधा विचारही नाही?" विक्रमने मुद्दाम दात काढत विचारलं.
शंभूने रुद्रच्या मिठीतून मान बाहेर काढली आणि विक्रमकडे बघून जीभ दाखवली. "तु तर बोलूच नको विक्रम दादा! आत्ता तुला बहिणीची आठवण आली...आधी माझ्या दादाला भेटू द्या, मग बघू तुमचं काय करायचं ते!"
तिचं हे बोलणं ऐकून रुद्र आणि विक्रम दोघेही खळखळून हसले. रुद्रने शंभूच्या डोक्यावर प्रेमाने टपली मारली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तो घराच्या उंबरठ्याकडे चालू लागला. रुद्र आणि शंभूचं ते गोड नातं निहाळत विक्रमही हसत हसत घरात शिरला. पण घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच रुद्रच्या नजरेसमोर एक हळवं दृश्य आलं.
समोर यशोदा डोळ्यात आनंदाश्रू आणून उभ्या होत्या. आपल्या काळजाच्या तुकड्याला सुखरूप समोर पाहताच त्यांच्या मातृत्वाला जणू भरतं आलं होतं. रुद्रला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर साचलेली काळजी क्षणात ओसरली, पण डोळ्यांतून वाहणाऱ्या धारा थांबत नव्हत्या...
रुद्र आणि विक्रम दोघेही पुढे झाले आणि त्यांनी आदराने यशोदांच्या पायाला स्पर्श केला. यशोदांनी थरथरत्या हातांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय मायेने म्हणाल्या, "सुखी राहा बाळांनो... देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि वाईट नजरेपासून वाचवो!"
रुद्रने आईचा हात आपल्या हातात घेतला, "आई, कितीवेळा सांगितलंय तुला, असं रडू नकोस म्हणून. मी आलोय ना आता!"
"कसं रडू नको रे? टीव्हीवर त्या बातम्या पाहताना काळजात धस्स होतं माझ्या. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये... तुला काही लागलं-बिंगलं तर नाही ना?" यशोदांनी काळजीने विचारलं.
रुद्र काही बोलणार इतक्यात विक्रम हसत म्हणाला, "काकू, तुमचा मुलगा लोखंडासारखा आहे. त्याला काहीच होणार नाही...
"हो ग आई, तू काळजी नको करू. बाबा कुठे आहेत?" रुद्रने विचारलं.
"हे काय, आलोच..." मागून एक करारी पण आश्वासक आवाज आला. रुद्रचे बाबा, यशवंतराव बाजूच्या रूममधून बाहेर येत बोलले. त्यांच्या आवाजात एक प्रकारची शिस्त होती, पण डोळ्यांत आपल्या मुलाला पाहिल्याचं समाधान लपलेलं नव्हतं.
यशवंतरावांना पाहताच रुद्रने ताठ मानेने पण नम्रतेने त्यांच्या जवळ जाऊन वाकून त्यांना नमस्कार (मस्कर) केला. यशवंतरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "बरं झालं आलास. ड्युटीवर सगळं व्यवस्थित आहे ना?" वडिलांचा तो पहिला प्रश्न कर्तव्याबद्दलचाच होता...
"हो बाबा, सगळं नीट आहे," रुद्रने उत्तर दिलं.
यशवंतरावांनी विक्रमकडे पाहून विचारपूस केली आणि मग सगळ्यांना हॉलमध्ये बसायला सांगितलं...
यशोदांनी चटकन डोळे पुसले... रुद्र, तू हात-पाय धुवून घे बाळ.""विक्रम, तू पण हात-पाय धुवून घे, मी ताटं वाढते. आज तुमच्या आवडीचा बेत केलाय," असं म्हणत यशोदा काकू किचनकडे वळल्या...
थोड्यावेळात सगळे डायनिंग टेबलावर जेवायला बसले..यशोदा दोघानाही आग्रहाने वाढत होत्या..
"काकू, आजच्या जेवणाला खरंच तोड नाही! कॅम्पमध्ये या चवीची खूप आठवण येते."
यशोदा काकू हसल्या, पण त्यांचं लक्ष रुद्रकडे होतं, जो शांतपणे जेवत होता. जेवण आटोपल्यावर सगळे हॉलमध्ये येऊन बसले.. यशवंतरावांनी आता पेपर बाजूला ठेवला आणि आपला चष्मा टेबलावर ठेवून ते रुद्रकडे बघत स्थिर झाले.
"रुद्र, काल विनायकचा फोन आला होता. मृण्मयी इथे आली होती. खूप गुणी मुलगी आहे ती. आमचा सगळ्यांचा होकार आहे. मृण्मयीने सुद्धा तुला पसंत केलंय. आता तू फक्त 'हो' म्हणायचा अवकाश आहे."
मृण्मयीचं नाव यशवंतरावांच्या तोंडून ऐकताच, एका क्षणासाठी रुद्रच्या काळजाची धडधड वाढली. त्याच्या नजरेसमोर हॉस्पिटलच्या त्या काळरात्रीचा तो चेहरा तरळला... रडवेली पण तरीही धीर न सोडलेली मृण्मयी. त्याच्या काळजाचा एक कोपरा क्षणभर हळवा झाला, पण त्याने लगेच आपल्या लष्करी प्रशिक्षणाप्रमाणे स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवला. चेहऱ्यावरचा भाव बदलू न देता, त्याने स्वतःला एकदम नॉर्मल ठेवलं आणि बोलायला सुरुवात केली..
त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मान वर करून बाबांच्या डोळ्यांत पाहिलं.
"बाबा, मी आधीच सांगितलं होतं... मी लग्न करणार नाही. प्लीज, हा विषय पुन्हा काढू नका." रुद्रचा आवाज शांत पण तितकाच ठाम होता...
, "रुद्र अरे... असं कसं लग्न करणार नाही म्हणतोस? आयुष्यभर काय एकटाच राहणार आहेस का? हे बघ बाळा, प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर एका साथीदाराची गरज असतेच रे. आणि मृण्मयी... ती तर खरंच खूप चांगली मुलगी आहे. दिसायला जशी साधी, तशीच वागायलाही गोड आहे."
रुद्र शांतपणे आईचं म्हणणं ऐकून घेत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अजूनही स्थिर होते...
यशोदा पुढे म्हणाल्या, "अरे, ती डॉक्टर आहे, शिकली-सवरलेली आहे, तरीही तिच्या बोलण्यात किती नम्रता आहे. तिने तुला पाहिलंय, तुझ्या कामाबद्दल तिला सगळं माहीत आहे आणि तरीही तिची लग्नासाठी तयारी आहे. मग तूच का असा आडमुठेपणा करतोयस? नाही म्हणू नकोस रे... काय कमी आहे तिच्यात? सांग मला, तुला काय आवडलं नाही तिच्यात?"
रुद्रने एक खोल निश्वास सोडला. त्याला मृण्मयीत कोणतीही कमी दिसत नव्हती. उलट, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तिने दाखवलेलं धैर्य आठवून त्याच्या मनात तिच्याबद्दलचा आदर वाढलाच होता. पण त्याने स्वतःला सावरलं आणि हळूच आईचा हात थोपटत म्हणाला,
"आई, प्रश्न तिच्यात काय कमी आहे याचा नाहीच आहे. ती खरंच खूप चांगली मुलगी असेल, यात शंका नाही. पण प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे. माझ्यासोबत संसार थाटणं म्हणजे रोज भीतीशी खेळण्यासारखं आहे. आज मी इथे बसलोय, पण उद्या सीमेवर कुठल्या परिस्थितीत असेन हे कुणालाच माहीत नाही. अशा वेळी मी तिच्यासारख्या मुलीला 'प्रतीक्षेचं' आयुष्य का देऊ? तिला आनंद द्यायच्या वयात तिला माझ्या सुरक्षिततेसाठी मनात झुरत बसायला लावणं मला योग्य वाटत नाहीये गं."
"पण रुद्र, प्रत्येक सैनिकाची पत्नी हेच आयुष्य जगते ना? मग त्या काय सुखी नसतात का?" यशोदांनी विचारलं.
"असेल आई, त्या नक्कीच थोर आहेत. पण मला तरी सध्या हे धाडस होत नाहीये," रुद्रने आपलं वाक्य संपवलं आणि तो उभा राहिला. "आई, मला थोडं बाहेर जायचं आहे, आपण नंतर बोलूया यावर."विक्रम चल..
रुद्र तिथून निघाला खरा, पण मृण्मयीच्या नावाचं ते वलय त्याच्या मनातून जात नव्हतं...
क्रमशः

📖❤️ कथा वाचायला तयार आहात ना? ❤️📖
प्रेम, भावना, रहस्य आणि नात्यांच्या गुंतागुंतीने भरलेली ही कथा आता प्रतिलिपी मराठीवर उपलब्ध आहे! 🥰✨
🔥 पुढे काय घडणार?
💞 प्रेम जिंकेल की नात्यांची परीक्षा होईल?
🤫 रहस्य उलगडेल का?
संपूर्ण कथा वाचण्यासाठी कॉमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
📚✨ वाचा… आणि कथेच्या दुनियेत हरवून जा! ❤️😊
Advertisement

Event venue

Kurla East, Mumbai, Maharashtra, India

Tickets
Concerts, fests, parties, meetups — all the happenings, one place.

Ask AI if this event suits you

Keep the plans coming

More events in Mumbai

A R Rahman

Sun, 01 Nov at 07:00 pm Jio World Garden

Mumbai is happening.

See everything else that’s on — concerts, markets, comedy and more.