Advertisement
शिवशरणार्थ.....🙏🏻*'एकमेका साह्य करू'* या प्रांजल ध्येयाने २०१९ साली लिंगायत बिझनेस नेटवर्क अर्थात LBN हा एक व्हॉट्स ग्रुप आम्ही चार व्यावसायिक मित्रांनी मिळून केला; आणि आज ज्या मधे पुणे, पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्र तथा कर्नाटक मधील 1000 पेक्षा जास्त व्यावसायिक तथा उद्योजक सक्रिय आहेत.या ग्रुप मधे कुणीही अगदी छोट्या व्यावसायिक पासुन मोठ्या उद्योजक पर्यंत सर्व सहभाग घेऊ शकतात.बरेच उद्योजक छोट्या व्यावसायिकांना काय मदत करू शकतो याच उद्देशाने आत्तापर्यंत आयोजित केलेल्या मासिक मीटिंग साठी उपस्थित राहिले, आपण आपल्या समाजाला काही तरी देऊ शकतो केवळ या भावनेने सहभाग आणि समाजातील इतर व्यवसायिक तथा उद्योजक यांना प्रोत्साहित करण्याची भावना हे या बैठकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. मिटिंग मधे प्रत्येक वेळी उपस्थित राहुन व्यावसायासोबतच एकमेकांशी ऋनानुबंध देखील प्रस्थापित होत आहेत.
LBN मिटिंग व्यापार/व्यवहार यासाठी एक व्यासपीठ आहे
आत्ता पर्यंत ३००० पेक्षा जास्त व्यावसायिकांची मासिक मीटिंगसाठी उपस्थिती लाभली आणि या माध्यमातून जवळपास ₹.१० करोड पेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली आहे.
समस्त लिंगायत समाजातील व्यावसायिकांना एक आपले हक्काचे व्यासपीठ देण्याचा आमचा मानस आणि प्रामाणिक प्रयत्न आहे.
*LBN Expo 2k26 मधे जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावे*🙏🏻
*फायदे*
👉🏻 आपल्या समुदायातील यशस्वी उद्योजक - व्यावसायिकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संपर्क - संवाद साधण्यासाठी उत्तम संधी.
👉🏻 एकमेकांचा व्यवसाय, कौशल्ये आणि ज्ञान जाणून घेण्याची सदस्यांमध्ये दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याची संधी.
👉🏻 तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांना SUPPORT म्हणून LBN Expo आहे.
👉🏻 तुम्ही अधिक VISIBLE राहून तुमची व्यवसाय PROFILE वृद्धिंगत होण्यास मदत होईल.
👉🏻 तुम्हाला तुमच्या व्यवसायवाढीसाठी नवीन कल्पना, दृष्टीकोन आणि उद्योगविषयक INSIGHTS मिळेल.
👉🏻 तुम्ही संभाव्य सक्षम भागीदारांना भेटून भागीदारीच्या संधी शोधू शकता.
आणि
👉🏻महत्वाचं यशस्वी, अनुभवी, दूरदृष्टी असणाऱ्या अनेक गणमान्य उद्योजकांशी या निमित्ताने सखोल चर्चा, मैत्रीपूर्ण संवाद देखील साधता येणार आहे.
तेव्हा अवश्य आपल्या हक्काच्या व्यावसायिक व्यासपीठावर एकत्र येत या उज्ज्वल संधीचा लाभ घ्या.
या व अशा अनेक फायद्यासाठी कृपया LBN Expo 2k26 मधे सहभागी व्हावे🙏🏻
Team LBN 🤝
#lbn #basava #lingayat #veershaiva #business #shiva #Mahadev #mahatmabasaveshwar #ilyf
Advertisement
Event Venue
Ganesh Kala Krida Manch, Pune, Maharashtra, India
Tickets
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.











