बेळगांव - कारवार मोहीम

Sat, 06 Jun, 2026 at 09:30 am to Sun, 07 Jun, 2026 at 05:00 pm UTC+05:30

Belgaum Karnataka | Mumbai

Shivashourya Trekkers \u0936\u093f\u0935\u0936\u094c\u0930\u094d\u092f \u091f\u094d\u0930\u0947\u0915\u0930\u094d\u0938
Publisher/HostShivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
\u092c\u0947\u0933\u0917\u093e\u0902\u0935 - \u0915\u093e\u0930\u0935\u093e\u0930 \u092e\u094b\u0939\u0940\u092e
Advertisement
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
"बेळगांव - कारवार मोहीम"
जिल्हा : बेळगांव, उत्तर कन्नडा, राज्य : कर्नाटक
श्रेणी : सोपी
दिनांक : शनिवार दि. ६ व रविवार दि. ७ जून २०२६
"बेळगाव कारवार निप्पाणी सह संयुक्त महाराष्ट्र!! झालाच पाहिजे!!!" या घोषणेसह वर्षानु वर्ष चालू असलेले एक चिवट, महाराष्ट्रभिमानी आंदोलन. राजकीय रेषेखाली विभागणी झालेला हा भूभाग महाराष्ट्रा बाहेरील "आपला महाराष्ट्रच" आहे. तर चला सीमावर्ती मराठी मुलखातील मिरजन किल्ला, राजहंस गड, बेळगांव किल्ला, कित्तूर गढी असे गडकोट फिरुया. बेळगाव किल्ल्यातील "कमल बसदी" नावाचे इसवीसन १२०४ मध्ये काळया ग्रॅनाइट दगडात बांधलेले बांधलेले जैन मंदिर आहे. शिवाय याना गुहा (Yana Caves) येथे छोटा जंगल ट्रेक करूयात. याना हे कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कटगल पर्वतरांगेत असलेली एक अद्भुत नैसर्गिक रचना आहे. 'भैरवेश्वर शिखर' आणि 'मोहिनी शिखर' हे दोन अवाढव्य सुळके आहेत. या लेण्या मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहेत. ही दोन अवाढव्य खडकांमधील पोकळी आहे, जी लाखो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झाली आहे. या सुळक्यांच्या पोटात शिरून निसर्ग अनुभूती घेता येते. भैरवेश्वर शिखराच्या गुहेत भगवान शिवाची स्वयंभू मूर्ती आहे. पौराणिक कथेनुसार, भस्मासुराने भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाल्यावर इथेच तपश्चर्या केली होती.
रूपरेषा
शुक्रवार दिनांक ५ जून २०२६ रोजी रात्री ९.५४ वा. छ.शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-मंगलोर एक्सप्रेस (१२१३३) ट्रेनने "कुमटा (कर्नाटक)" कडे प्रयाण
पहिला दिवस - शनिवार दि. ६ जून २०२६
उत्तर कन्नडा (नॉर्थ कॅनरा) जिल्ह्यातील कुमटा रेल्वे स्थानकात सकाळी ९.३० वा. आगमन. खाजगी बसने याना गुहे कडे प्रस्थान. काही अंतरावर बस उभी ठेऊन निसर्ग ट्रेल करत याना परिसरातील घनदाट जंगलाचा, अवाढव्य सुळक्यांचा आनंद घेऊन. भगवान शिवाचे दर्शन घेऊन पुन्हा छोटासा ट्रेक करून आपल्या बसने मिरजन किल्ल्याकडे प्रयाण. वाटेतच दुपारचे जेवण. अंकोला येथील मिरजन भुईकोट पण प्रशस्त किल्ल्याला भेट देऊन बेळगाव शहराकडे रवाना.बेळगांव येथे रात्रीचे जेवण आणि मुक्काम
दुसरा दिवस - रविवार दि. ७ जून २०२६
सकाळी नाश्ता करून ८ वा. बसने बेळगांव शहरातील किल्ला दर्शन. त्यानंतर बसने राजहंस किल्ल्याकडे रवाना. राजहंस किल्ला पाहून वाटेत दुपारचे जेवण आणि कित्तूर किल्ला दर्शन. सायंकाळी ५.०० वाजताची शरावती एक्सप्रेस (११०३६) ट्रेन ने मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु.
इच्छुक सदस्यांनी मुबंई वरून जाताना मुंबई-मंगलोर एक्सप्रेस (१२१३३) या ट्रेनचे "कुमटा रेल्वे स्थानक" साठी आणि बेळगाव ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी शरावती एक्सप्रेस (११०३६) या ट्रेनचे आगाऊ आरक्षण दोन महिने आधी स्वतः करणे आणि मोहीम प्रमुख किंवा मोहीम कार्यवाह यांना कळविणे. सहभागी सदस्यांनी शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी ९:३० पर्यंत कुमटा स्थानकात जमणे बंधनकारक असेल.
ट्रेक फी : रु. ३०००/- (रुपये तीन हजार फक्त) प्रति व्यक्ती
ट्रेक फी मध्ये बेळगाव आणि कारवार मधील बस प्रवास, शनि-रवि वारचा सकाळचा चहा-नाश्ता, शनि-रवि दुपारचे जेवण, फक्त शनिवार संध्याकाळचा चहा-बिस्किटे, फक्त शनिवार रात्रीचे जेवण आणि शनिवार रात्रीचा मुक्काम अंतर्भूत आहे. मात्र मुंबई ते कुमटा प्रवास आणि परतीचा बेळगाव ते मुंबई रेल्वे / बस प्रवास खर्च सदस्यांनी स्वतः करायचा आहे.
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. २८५० /- (रुपये दोन हजार आठशे पन्नास फक्त) प्रति व्यक्ती असेल. ("आजीव सदस्य ओळखपत्र" मोहिमेत बाळगणे बंधनकारक, ओळखपत्र असेल तरच सवलत मिळेल)
मोहिमेत सदस्य संख्या २६ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर नाश्ता, पाणी बाटली नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) मधमाशांचा वावर असल्याने परफ्यूम, बॉडी स्प्रे वापरू नये
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, रेनकोट, जरुरी पुरते कपडे.
४) पाण्याची १ लिटर बाटली.
५) स्वतः पुरता सुका खाऊ.
६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
७) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे व्यवस्थित राहतील.
नियम :-
१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
२) 'आवश्यक साहित्य' आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
५) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
६) ट्रेक करताना इतर सभासदांसोबत राहावे. आपला ग्रुप सोडून गडाच्या कड्यावर, आड वाटेला एकटे जाऊ नये. लघु शंका किंवा तत्सम महत्वाचे कारण असल्यास मोहीम प्रमुखांना सांगून जावे. एकटे कुठेही जाणे हे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
७) मोहिमेत सदस्य संख्या २६ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.
८) अनुकूल परिस्थिती होते ती सहल असते आणि प्रतिकुल परिस्थितीत होतो त्याला ट्रेक म्हणतात. सदर मोहिम/ट्रेक केवळ मौज मजेसाठी आयोजित केलेली सहल नसून ट्रेकिंग संस्कृती रुजावी, वाढावी, गडकिल्यांचे महत्व. इतिहासाचे अवलोकन हा आमच्या आयोजनाचा हेतू आहे. त्यामुळे सहलीत मिळणारी Luxurious Treatment, सोई सुविधा या मोहिमेत मिळणार नाहीत. शहरी लोकांना उघड्यावर शौचास बसणे, पाणी पुरवून वापरणे, जेवणाची वेळ मागे पुढे होणे, खडबडीत जमिनीवर झोपणे याची सवय नसते. या अश्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेतलेत तर ट्रेक Enjoy कराल, अन्यथा पदरी निराशाच पडेल.
टीप : आपला मुक्काम बेळगाव शहरात धर्मशाळेत असल्याने स्वच्छता गृहाची सोय आहे, चिंता नसावी.
नाव नोंदणी प्रक्रिया :
१) नाव नोंदणी करण्या आधी मोहीम प्रमुखांशी 98900 31187 / 9320755539 या क्रमांकावर मोहिमेत जागा आहे/नाही हे विचारून घ्या. नाव नोंदणीची अंतिम तारीख शनिवार दि. ३० मे २०२६ असेल किंवा २६ सदस्य संख्या पूर्ण झाल्यास नोंदणी बंद करण्यात येईल व प्रतिक्षा यादी (waiting List) चालू होईल. त्यानंतर दुसऱ्या वाहनाचा विचार करण्यात येईल.
२) वर नमूद ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता "शिवशौर्य ट्रेकर्स - 9320755539 " या क्रमांकावर WhatsApp करावी.
बँक तपशील :-
Account Name - SHIVASHOURYA TREKKERS
Account No - 60134804616
Bank Name - Bank of Maharashtra
Branch - Prabhadevi
IFSC Code - MAHB0000318
Branch Code - 000318
३) फी भरल्या नंतर सदर ट्रेकचा गूगल फॉर्म मोहीम प्रमुखांकडून मागून घ्यावा आणि इंग्रजी मध्ये भरुन पाठवावा.
4) इच्छुक सदस्यांना "बेळगांव - कारवार मोहीम" या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
5) अंतिम दिनांक उलटून गेल्या नंतर आणि जर ट्रेक मध्ये जागा शिल्लक असेल तर ट्रेक फी वाढीव रुपये १००/- अधिक भरावी लागेल.
नाव नोंदणी रद्द प्रक्रिया :
१) नाव रद्द करायचे झाल्यास शनिवार ३० मे २०२६ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल.
२) शनिवार ३० मे २०२६ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
३) तुम्हाला ट्रेकला येण्यासाठी अडचण असल्यास तुमच्या जागी अन्य दुसऱ्या व्यक्तीला ट्रेकला पाठवू शकता (ती व्यक्ती ट्रेक करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे)
आपले नम्र :-
*मोहीम प्रमुख - विवेक जाधव / 98900 31187 *
मोहीम कार्यवाह - अमित मेंगळे / 9320755539
=================
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे - स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली - श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा - श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
मुंबई - अजित नर / ९८१९५६६१२०
पालघर / वसई / विरार - हार्दिक म्हात्रे / ९०४९० १३६७७
नवी मुंबई - सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक :
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/...
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट : http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम : shivashourya_trekkers
शिवशौर्य ट्रेकर्सच्या आगामी मोहिमांच्या माहितीकरिता Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा. Join us Whatsapp Group :- https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0
Advertisement

Event Venue

Belgaum Karnataka, Mumbai, Maharashtra, India

Tickets

Icon
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.

Ask AI if this event suits you:

More Events in Mumbai

Guided Nature Walk with The Wide Lens
Sat, 06 Jun at 07:30 am Guided Nature Walk with The Wide Lens

Maharashtra Nature Park: Mumbai

BNHS - CEC Forest Trail
Sat, 06 Jun at 07:30 am BNHS - CEC Forest Trail

Conservation Education Centre Of BNHS: Mumbai

Forest Walk
Sat, 06 Jun at 07:30 am Forest Walk

Conservation Education Centre Of BNHS: Mumbai

Fireflies Special Bhandardara Camping - Ac Bus
Sat, 06 Jun Fireflies Special Bhandardara Camping - Ac Bus

Meeting Point-Borivali National Park: Mumbai

Mahalaxmi DHOBIGHAT by The Roamers' Club
Sat, 06 Jun at 08:00 am Mahalaxmi DHOBIGHAT by The Roamers' Club

Dhobi Ghat Viewing Deck: Mumbai

BlackHorse: Heritage Walk By Khaki Tours
Sat, 06 Jun BlackHorse: Heritage Walk By Khaki Tours

Kala Ghoda Statue: Fort, Mumbai

Water Kingdom
Sat, 06 Jun Water Kingdom

Water Kingdom: Mumbai

Daily Breads
Sat, 06 Jun at 10:00 am Daily Breads

Culinary Craft: Mumbai

Ltd Edition Mumbai Exhibition
Sat, 06 Jun at 10:30 am Ltd Edition Mumbai Exhibition

Scout Pavillion, Shivaji Park

Entrepreneurs Meetup by We Founders Collab Thane 2026
Sat, 06 Jun at 10:30 am Entrepreneurs Meetup by We Founders Collab Thane 2026

Suyash Tripathi & Co.

Mumbai is Happening!

Never miss your favorite happenings again!

Explore Mumbai Events