Advertisement
🎶 स्वरसंध्या - आपली माणसं, आपली गाणी 🎶आयोजक: बृहन्महाराष्ट्र मंडळ, क्वीन्सलँड इन्क. (BRIMMQ)
स्वरसंध्या हा मराठी भाषा, कला आणि संस्कृती साजरी करणारा एक विशेष संगीत कार्यक्रम आहे.
🌸 स्वरसंध्या केवळ एक कार्यक्रम नाही — आपली सांस्कृतिक गुंतवणूक आहे.
विशेषतः आपल्या पुढील पिढीसाठी केलेली ही एक महत्त्वाची सांस्कृतिक पायाभरणी आहे.
या कार्यक्रमात २० हून अधिक स्थानिक कलाकार सहभागी होत असून त्यामध्ये अनुभवी कलाकार, युवा कलाकार तसेच मुले यांचा समावेश आहे. सर्व कलाकारांनी अनेक आठवडे नियमित सराव केला आहे.
६ ते १२ वयोगटातील मुलांना निवेदन (सूत्रसंचालन) साठी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यातून त्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि मराठी संस्कृतीवरील अभिमान वाढवण्याचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमादरम्यान आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहोत.
भारतीय सरकारने मराठी भाषेला दिलेल्या अभिजात (Classical) भाषेच्या दर्जाचा गौरव या निमित्ताने केला जाईल.
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Queensland Multicultural Centre, 102 Main St, Kangaroo Point ,Brisbane,QLD,Australia
Tickets
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.











