Advertisement
आनंदयोग बाबा आमटेंचे प्रकल्प पाहण्याची ईच्छा प्रत्येक मराठी माणसाला असतेच. त्यांनी सुरू केलेल्या कामाचा वटवृक्ष आजही आपल्याला सहसंवेदना, त्याग आणि जिद्द या सगळ्याची प्रेरणा देतो. समाजाने घृणास्पद ठरवलेल्या व्यक्तींचे जगणे सुसह्य व स्वावलंबी व्हावे, यासाठी बाबा व साधनाताईंनी त्यांचे आयुष्य वेचले. त्यांच्या बरोबरीने पुढची पिढीही म्हणजेच डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे यांनीही हे काम तितक्याच ताकदीने पुढे नेले. आता तिसरी पिढीदेखील हा कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी झटत आहे.
कोणत्याही सामाजिक कार्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हातभार लावणे आपल्याला शक्य असते. या सहलीच्या माध्यमातून आपण हाच प्रयत्न करतो. समविचारी व्यक्तींसोबत अशा सहली आपल्याला वैचारिकदृष्ट्या अधिक समृद्ध करतात. बाबांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे कार्य समजून घेणे आणि त्यातून प्रेरणा घेऊन समाजाला उतराई होण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलणे, या कल्पनेतून ही सहल सुरू झाली. अधिकाधिक लोकांनी महाराष्ट्राचे भूषण असलेला बाबा आमटेंचा आनंदवन प्रकल्प पहावा, या हेतूने ही माहितीपूर्ण सहल आयोजित केली जाते.
शलाका वारंगे
Xplore Eco Tours
9834285130
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Mahad, Raigad, Mahad Raigad,Pune, Maharashtra, India
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.










