Advertisement
दिनांक 20 व 21 डिसेंबर 2019, रोजी पुसद येथे आपली Alumni meet झाली होती. त्या आठवणी घेवून आपण तिथून आपण निघालो.Meet sucessfully पार पडल्यानंतर कुणालाही अंदाज नसलेला Corona हा विषाणू, 20 मार्च 2020 ला जगभरात तसेच भारतातही पसरला. त्यानंतर सर्व मंडळी जी कामावर होती जी कामावर नव्हती सर्व आपापल्या घरी जीव मुठीत घेऊन बसली. पहिले काही महिने जाणवले नाही, मात्र लवकरच आर्थिक अडचण बहुतांश लोकांना जाणऊ लागली. बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी करण्याचे निर्णय देवून ते कमी करण्यास सुरुवात केली. कित्येक कर्मचारी नवीन नोकरी नाही तर व्यवसायामध्ये जाण्यास सुरुवात झाली.
हे सर्व आपल्या सर्वांच्या बाबतीतही होतच होते. चालू काम ऑनलाईन करावे लागत होते, त्याला काही पर्याय ही उरला नव्हता. कित्येक लोकांना बिन पगारी महिने काढावे लागले, कित्येक लोकांना आहे त्या पगाराएवढा पगार ही मिळत नव्हता. कोणी आपल्या परिवाराला सोडून कामाच्या ठिकाणी राहून दिवस घालवत होते. त्यातच काही चांगल्या लोकांनी आपले प्राण ही त्यात गमावले. ते आपले परिचित होते सखे होते जाणकार होते. पण आपण सर्वांनी ते मूग गिळून सहन केले आणि corona ला सामोरे गेलो.
मग काही दिवसांनी corona वर लस आली, ती आपण सर्वांनी घेतली आणि जग पूर्ववत येतो तोवर corona ची दुसरी लाट आली. ही लाट फार भयंकर होती, रोजच्यारोज वाईट बातम्या येत होत्या. जो त्यात सापडला परत येण्याची संभावना करूच शकत नव्हता.
तरीही आपण सर्व लढलो आणि अंती आपण जिंकलो.
आपण जिंकलो खरे पण खरी परीक्षा मात्र पुढे होती आणि ती होती स्वतःच्या अस्तित्वाची.
सर्वांनी ती परीक्षा पण उतिर्णा करत, पुढे वाटचाल सुरू ठेवली. ह्यात सर्वांनी एकमेकांना धीर देत एकमेकांना सांभाळत सर्वांना एकजूट ठेवत ही परीक्षा शंभर टक्के गुणांनी उत्तीर्ण केली.
त्यानंतर जग सुरळीत होऊ लागले. आपणही आपापल्या कामाला लागलो. पण एकत्र येऊन कधी संवाद साधता आला नाही. भेटलो तरी छोट्या छोट्या कार्यक्रमातून आणि अगदी मोजक्या संख्येने.
सर्व लोक वाट बघू लागली Alumni meet साठी, नाही तर मोठ्या Get together साठी. पण ती संधी येतायेत नव्हती.
आता तीच संधी आपल्याला चालून आली आहे पुन्हा एकदा एकत्रित होण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, येत्या 5 आणि 6 एप्रिलला नागपूर येथे आयोजित होणाऱ्या GT मध्ये भाग घ्यावा आणि आपल्यातील हेवेदावे विसरून, आपल्या भावना व्यक्त कराव्या.
*तर मग आपण ही GT miss न करता एकमेकांना भेटायला यायला पाहिजे ही मनःपूर्ण विनंती*
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Fun planet water park Nagpur, Nagpur, India