महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम "किल्ले ब्रह्मगिरी (त्रिंबकगड)"

Sat Mar 08 2025 at 06:00 am to 01:00 pm UTC+05:30

Nashik, Maharastra | Nashik

Shivashourya Trekkers \u0936\u093f\u0935\u0936\u094c\u0930\u094d\u092f \u091f\u094d\u0930\u0947\u0915\u0930\u094d\u0938
Publisher/HostShivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
\u092e\u0939\u093f\u0932\u093e \u0926\u093f\u0928\u093e\u0928\u093f\u092e\u093f\u0924\u094d\u0924 \u092e\u0939\u093f\u0932\u093e \u0935\u093f\u0936\u0947\u0937 \u092e\u094b\u0939\u0940\u092e "\u0915\u093f\u0932\u094d\u0932\u0947 \u092c\u094d\u0930\u0939\u094d\u092e\u0917\u093f\u0930\u0940 (\u0924\u094d\u0930\u093f\u0902\u092c\u0915\u0917\u0921)"
Advertisement
महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम "किल्ले ब्रह्मगिरी (त्रिंबकगड)"
तालुका : त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
उंची - ४२०० फूट
दिनांक : ८ मार्च २०२५

"किल्ले ब्रह्मगिरी" हा महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित "Ladies Special Trek".
जिच्या उदरातून जन्म घेते ही सृष्टी सारी,
अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी.
लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला,
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला.
स्त्री म्हणजे जन्मदात्री,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे घराच घरपण.

विधात्याच्या या चतुरस्र रचनेस साजरे करण्यास एक दिवस पुरेसा तरी कसा असेल? पण हा एक दिवस तिच्यासाठी किती उमेद घेऊन येऊ शकतो! नव्या उमेदीने नवी शिखरं पादाक्रांत करण्याची तिची कुवत कालातीत आहे, पण हे तीच कधी कधी संसाराच्या रामरगाड्यात विसरते, हे दुर्दैव. स्वतःच्या विसर पडलेल्या क्षमतेची तिलाच परत आठवण करून देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून शिवशौर्य ट्रेकर्स दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सुमारास महिला विशेष मोहिमेचे आयोजन करून विधात्याच्या या परिपूर्ण रचनेस मुजरा करत आली आहे. त्यातला एक विशेष योगायोग हा यंदा 'सोने पे सुहागा' आहे. ही संस्थेची १५०वी मोहीम ठरणार आहे. हा मोलाचा दगड सर्व मैत्रिणींनी एकत्र घेऊन साजरा करायचं आम्ही योजिलं आहे. अब्राहाम लिंकनच्या लोकशाहीच्या व्याख्येला उसने घेऊन थोडा फेरफार करत आम्ही म्हणतो, 'Of The Ladies, By The Ladies, For the Ladies' असा हा अभिनव प्रयोग घेऊन आलो आहोत. स्त्री ही कायम तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर परिस्थितीवर स्वार झाली आहे. मग आपण तरी मागे का राहावं? यंदा १५० जणींना घेऊन गोदावरीचा उगम असलेल्या किल्ले ब्रह्मगिरीवर आपली विजयश्री पताका फडकवूयात. कार्य सिद्धीस नेण्यास शेजारी उभा असलेला त्र्यंबकेश्वर आहेच. त्याच्या आशीर्वादाने शनिवारी ८ मार्च २०२५ रोजी, १५० वी मोहीम १५० जणींच्या पुढाकाराने फत्ते करु. आम्ही वाट पाहतो आहे तुमच्यासारख्या थोड्याशा साहसी, थोड्याशा धाडसी आणि दैनंदिन जीवनाला मागे टाकून उमेदीने पुढे बघणाऱ्या मैत्रिणींची. वयाची अट नाही, फक्त तुमची साथ हवी आहे. फक्त आपण मुली आणि बायका! एक दिवस फक्त आपला म्हणून आपलासा करू.
त्र्यंबकेश्वर, भारतातील १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक. पौराणिक, ऐतिहासिक तसेच भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेल्या या प्रदेशातून सह्याद्रीची त्र्यंबक डोंगररांग गेलेली आहे. यात असलेला विस्ताराने सगळ्यात मोठा किल्ला म्हणजे त्रिंबकगड किंवा ब्रह्मगिरी. प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाणाऱ्या व्यापारी मार्गावर संरक्षण देण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली गेली होती. १३व्या शतकातील देवगिरी राजवटीपासूनचा इतिहास किल्ल्याला लाभला आहे. शिवाय त्र्यंबकेश्वर परिसरातील या किल्ल्यांचे उल्लेख थेट पुराणातही आढळतात. शंकराने जटा आपटून गंगा भूमंडळी आणली, त्या गौतमी गंगेचा उर्फ गोदावरी नदीचा उगम येथून होतो.
कार्यक्रमाचा तपशील :-
७ मार्चला रात्रौ ९:३० वाजता बसने मुंबईहून त्र्यंबकेश्वरसाठी रवाना. ८ मार्चला पहाटे ४ वाजता त्र्यंबकेश्वर मध्ये आगमन. आन्हिकं उरकून ब्रह्मगिरी गडाकडे प्रस्थान. ८ वाजता गड माथ्यावर पोहोचणे. गड फिरून थोडा आराम करणे, अंदाजे ११.०० वाजता गड उतरायला सुरुवात. नंतर खाली उतरुन जेवण. बसने मुंबईकडे रवाना. अंदाजे र‍ात्रौ ९ वाजेपर्यंत मुंबईत परतणे.
ट्रेक फी :- ऐच्छिक. महिला दिनानिमित्त महिलांसाठी ट्रेक आहे, त्यामुळे ट्रेकची फी सुद्धा तिच्या इच्छेनेच !
मोहिमेत सदस्य संख्या १५० इतकी असल्याने आपली नावे नोंदविणे आणि आपल्या मैत्रिणींनाही पाचारण करणे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी २०२५ असेल.
टीप - चालतांना काठी असणे आवश्यक आहे कारण शेवटच्या टप्यात असलेली माकडं काठीच्या आवाजाने लांब राहतील.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. गरज असल्यास चालताना काठी, नी-कॅप घ्यावेत (परफ्यूम, बॉडी स्प्रे, भडक रंगाचे कपडे टाळावेत).
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, टोपी, गॉगल, एक्स्ट्रा चप्पल, जरुरी पुरते कपडे, साबण, टॉवेल, टॉर्च.
३) पाण्याची २ लिटर बाटली, स्वतः पुरता सुका खाऊ.
४) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
नियम :-
१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
२) 'आवश्यक साहित्य' आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
५) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
६) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील.
७) नावे नोंदविल्याच्या क्रमानुसार बसमध्ये पुढून मागे अशा क्रमाने जागा दिली जाईल.
वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख - स्वाती तारवी - ९७६३३४५७७६
मोहीम कार्यवाह - नम्रता सावंत / ९६१९७ ४५९७५
नाव नोंदणी झाल्यावर "ब्रह्मगिरी महिला विशेष ट्रेक" या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, सूचना आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
मुंबई - संघमित्रा मेंगळे / ९८१९६ ६२२५४
मुंबई - तेजश्री खरपुडे / ९८९२१ ७०६०३
मुंबई - आदिती कातकर / ९०८२३००९५४
जोगेश्वरी - गायत्री म्हात्रे / ७२०८५ ३४८१७
डोंबिवली - विशाखा चौधरी / ७५०६९ १७३२१
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट : http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम :
shivashourya_trekkers
शिवशौर्य ट्रेकर्सच्या आगामी मोहिमांच्या माहितीकरिता Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.
📍Join us WhatsApp Group :-
https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0
Advertisement

Event Venue & Nearby Stays

Nashik, Maharastra, India

Discover more events by tags:

Trips-adventures in NashikTrekking in Nashik

Sharing is Caring:

More Events in Nashik

Pravin Patil
Fri, 28 Mar, 2025 at 12:00 am Pravin Patil

Dhruv Nagar

Nashik is Happening!

Never miss your favorite happenings again!

Explore Nashik Events