Advertisement
नमस्ते सर्व मराठी स्नेही ! 27 फेब्रुवारीला ज्ञानपीठ विजेत्या कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. गेल्या दोन वर्षांपासून या निमित्ताने सावली सोशल सर्कलने आठवडाभराचा मराठी भाषा महोत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये विविधांगी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
दिनांक 23 फेब्रुवारीला आपण मराठी कवींचे काव्य संमेलन आयोजित करत आहोत. आपल्यातील सर्व कवी मित्रांना या निमित्ताने आम्ही आवाहन करतो की, त्यांनी मोठ्या संख्येने या कवी संमेलनात भाग घ्यावा.
नियम व अटी :
१) स्वरचित कविताच पाठवाव्या .
२) मराठी कविताच या कवी संमेलनात सादर करण्यात येतील.
३) वयाची अट नाही
४) कवि संमेलन विविध रस पूर्ण व्हावे . त्यासाठी आपण आपल्या प्रत्येकी दोन कविता खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअप द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून द्याव्यात. त्याचे परीक्षण करून कवी संमेलनात भाग घेणाऱ्या कवींची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. तसे प्रत्येक इच्छुक कवीला वैयक्तिकरित्या कळवले जाईल.
५) हे कवी संमेलन असून विविध रसांच्या कविता यात सादर व्हाव्या असे अपेक्षित आहे. ही काव्यवाचनाची स्पर्धा नसल्याने कोणालाही कुठलेही पारितोषिक मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
६) कवी संमेलनात भाग घेण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
७) कोल्हापूर बाहेरील कवींच्या निवासाची सोय संस्थेतर्फे करता येईल मात्र त्यासाठी आगाऊ सांगणे गरजेचे आहे.
८) कवी संमेलनाच्या दिवशी सहभागी कवींचे चहापान व भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाईल.
९) कविता नाकारण्याचा अंतिम अधिकार परीक्षण मंडळाला असेल.
१०) कविता पाठवण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 ही असेल
आपण कविता
जुई कुलकर्णी ९९६०१९४३९० किंवा
सौरभ शेवाळे ९९७५२१५३१५
यांना पाठवू शकाल.
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Sawali Care Center, Pirachi Wadi, Radhanagari Road,Kolhapur, India